अंकिता जाधव| शारदिय नवरात्रोत्सवाचा आज तिसरा दिवस, कोळ्यांची तारणकरर्ती अशी जीची ख्याती आहे त्या वरळीच्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सव काळात कोळी बांधवांसह मुंबईतील अनेक भक्तगणांची गर्दी पाहायला मिळते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये जाणून घेऊयात वरळीच्या ग्रामदेवतेची अनेखी कथा...
नवरात्रोत्सवाचा आज तिसरा दिवस आजची आपली मुंबईची आई आहे वरळीची ग्रामदेवता जरी मरी कोळ्यांची तारणकरर्ती वरळीची ही ग्रामदेवता सदैव तिच्या गडावर आपल्या भक्तांच्या सेवेकरता गेल्या वर्षानुवर्षांपासून तिच्या टेकडीवर सज्ज आहे तीला अपेक्षा आहे ति भक्तांच्या नसीम प्रेमाची आणि भक्तीची. मुंबईतील वरळी परिसरात उंच टेकडीवर वसलेले गोल्फादेवीचे मंदिर कोळी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात गोल्फादेवीसह साकबादेवी आणि हरबादेवीचीही मूर्ती आहे. या देवाच्या मंदिरात कौल लावण्याची प्रथा फार पूर्वापार चालत आली आहे. देवीच्या तिन्ही मूर्ती पाषणाच्या आहेत. नवरात्रोत्सव काळात कोळी बांधवांसह मुंबईतील अनेक भक्तगण दर्शनासाठी या मंदिरात येतात.
या माय माउलीची काय आहे महती जाणून घेवूयात या मंदिराचे अध्यक्ष नंदू गावडेजींकडून, ज्यावेळेला मुंबई 7 बेटा झाली त्यावेळेला वरळीच्या बेटावर जरीमरी मातेचा उगम झाला. याठिकाणच्या चारही बाजूला डोंगर होते. ज्या डोंगरावर जरीमरी माता विराजमान आहे त्या डोंगराच्या मागे समुद्र होता. पुर्वी या डोंगराला वाट नसल्याकारणाने मातेच्या दर्शनासाठी सगळे भक्तगण डोंगरावर चढून देवीचे दर्शन घेत होते. तसेच याविभागातल्या कोणत्याही शुभ कार्याचे प्रारंभ करण्यासाठी देवीच्या चरणी इथली लोक लीन होतात.